राजकीय

मराठा आरक्षणासाठी लढा देणारी संभाजी ब्रिगेड पुढील महिन्यात आपली राजकीय भूमिका जाहीर करणार ,महापालिका निवडणूक लढण्याची शक्यता?

तरुणांची मोठी फळी संभाजी ब्रिगेडकडे आहे

मराठा आरक्षणासाठी लढा देणारी संभाजी ब्रिगेड पुढील महिन्यात आपली राजकीय भूमिका जाहीर करणार,महापालिका निवडणूक लढण्याची शक्यता ? 

तरुणांची मोठी फळी संभाजी ब्रिगेडकडे आहे

प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी लढा देणारी संभाजी ब्रिगेड पुढील महिन्यात आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. संभाजी ब्रिगेड महापालिका निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये कुणासोबत युती करायची आणि नाही याची भूमिका संभाजी ब्रिगेड जाहीर करणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड महापालिका निवडणुकीत पर्याय बनणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

येत्या 30 डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेडची मुंबईत बैठक होणार आहे. यावेळी किती महापालिकांच्या निवडणुका लढवायच्या आणि कुणासोबत युती करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच 30 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याचं आयोजनही करण्यात आलं आहे. या मेळाव्यात संभाजी ब्रिगेडकडून राजकीय भूमिका जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे रंगशारदा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याकडेही सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

राज्यभरातून कार्यकर्ते येणार

दरम्यान, या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते येणार असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. हा मेळावा म्हणजे संभाजी ब्रिगेडचं शक्तिप्रदर्शन असणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या या मेळाव्याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शहरी आणि ग्रामीण भागावर लक्ष

सध्या सन 2011 च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये किमान 16 तर जास्तीत जास्त 65 सदस्य संख्या आहे. तर महापालिकांध्ये किमान 65 तर जास्तीत जास्त 175 पर्यंत आहे. मुंबई महापालिकेतही ही संख्या 227 आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशात सन 2011 ची जनगणना अद्याप सुरु होऊ शकलेली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान 15 महापालिकांच्या तसेच सुमारे 100 हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनेही दंड थोपाटले असून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संभाजी ब्रिगेडची शहरी आणि ग्रामीण भागात मोठी क्रेझ आहे. तरुणांची मोठी फळी संभाजी ब्रिगेडकडे आहे. त्यामुळेच संभाजी ब्रिगेडकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram