राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता,पुढील तीन दिवस वातावरण ढगाळ राहणार 

मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता,पुढील तीन दिवस वातावरण ढगाळ राहणार 

मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

प्रतिनिधी

राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे.

राज्यातील काही भागात 3 डिसेंबरपर्यंत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

राज्यातील कोकणसह धूळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, जळगाव, औरंगाबाद, पुणे या जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तवली आहे.

दरम्यान, मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरूवात झाली. सायन, कुर्ला, वांद्रे परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. काल दिवसभर मुंबईकरांनी ढगाळ वातावरण अनुभवले आहे.

साताऱ्यात अवकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळपासून सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला होता त्याप्रमाणे पाऊस पडत आहे.

रत्नागिरीजिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पाऊस पडत आहे. आज जिल्ह्यात हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस जिल्ह्यात हवामान विभागाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमार यांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram