उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‘अ’ वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल
या मतदारसंघात 195 मतदार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‘अ’ वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल
या मतदारसंघात 195 मतदार आहेत.
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी बारामती तालुका प्रतिनिधी ‘अ’ वर्ग मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुण्यातील बँकेच्या निवडणूक कार्यालयात आज अजित पवार यांच्या वतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले. पहिल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश हरिभाऊ तावरे, अनुमोदक म्हणून दिपक मलगुंडे दुस-या उमेदवारी अर्जावर अमोल गावडे यांनी सूचक तर लालासाहेब नलवडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. या वेळी बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक सुधीर पानसरे उपस्थित होते.
या मतदारसंघात 195 मतदार आहेत. अजित पवार यांचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व असून संचालक मंडळही त्यांच्याच संमतीने ठरणार हे उघड आहे. सन 1991 पासून अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवडून गेलेले असून सात वेळा ते या बँकेचे अध्यक्ष होते. राजकारणाचा प्रारंभ या बँकेच्या संचालकपदापासूनच झालेला असल्याने या बँकेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे.