प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ यांचे 67 व्या वर्षी निधन
दुरदर्शन, एनटीव्ही या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पत्रकारिता करणारे सुरुवातीचे पत्रकार होते.

प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ यांचे 67 व्या वर्षी निधन
दुरदर्शन, एनटीव्ही या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पत्रकारिता करणारे सुरुवातीचे पत्रकार होते.
प्रतिनिधी
प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ यांचे 67 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती दुआ यांची कन्या मल्लिका दुआ यांनी शनिवारी दिली आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर विनोद दुआ यांना वर्षाच्या सुरुवातीला दाखल करण्यात आले होते. त्यांची पत्नी रेडिओलॉजिस्ट पद्मावती यांचे जूनमध्ये कोरोनामुळे निधन झाले होते. दुआ यांच्या मृतदेहावर लोधी येथे रविवारी अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.
विनोद दुआ यांची कन्या, अभिनेत्री मल्लिकाची भावूक पोस्ट
मल्लिका दुआ यांनी वडिलांच्या निधनाची माहिती देणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले, की आदरणीय, निर्भय आणि असमान्य अशा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. ते अतुलनीय असे जीवन जगले. दिल्लीमधील निर्वासित कॉलनीत ते वाढले. त्यांनी 42 वर्ष पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविली. ते नेहमीच सत्याच्या सामर्थ्याबाबत बोलत असायचे. ते आता आमच्या आईसोबत आहेत. ते स्वर्गातील पत्नीसोबत गाणे म्हणतील, स्वयंपाक करतील, प्रवास करतील, असे भावुकपणे मल्लिकाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दुआ दाम्पत्य रुग्णालयात झाले होते दाखल
दुरदर्शन, एनटीव्ही या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पत्रकारिता करणारे सुरुवातीचे पत्रकार होते. त्यांना सोमवारी अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विनोद दुआ आणि त्यांच्या पत्नीला गुरग्राममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची तब्येत खालावली होती. वैद्यकीय मानसिक रोगतज्ज्ञ बकुल दुआ यांचे विनोद दुआ वडील होते.