इंदापूर

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पूर्व तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

भिगवण येथून झाली सुरुवात

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पूर्व तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

भिगवण येथून झाली सुरुवात

इंदापूर : प्रतिनिधी

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार (दि.६) पासून इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पुर्व तपासणी शिबिरास सुरवात झाली असून भिगवण येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये सोमवारी ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हजारो जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांनी या तपासणी शिबिरासाठी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे-पाटील,जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर,पंचायत समिती सदस्य दादासो वणवे,सचिन बोगावत,माजी तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील,माजी कार्याध्यक्ष अमोल भिसे,नवनाथ रूपनवर,संग्रामसिंह पाटील,महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर,युवती तालुकाध्यक्ष अश्विनी कुर्डे,मनोज राक्षे,भिगवणचे मा.सरपंच महेश शेंडगे,काझड गावचे सरपंच अजित पाटील,सतिश शिंगाडे ,मेहबूब शेख,विजयकुमार गायकवाड,रोहित हेळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button