नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास हॅक ; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा

हॅकरने कोविड-19 रिलीफ फंडासाठी डोनेशन म्हणून बिटकॉइनची मागणी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास हॅक ; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा

हॅकरने कोविड-19 रिलीफ फंडासाठी डोनेशन म्हणून बिटकॉइनची मागणी केली होती.

नवी दिल्ली -प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या @narendramodi हे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे टि्वट हॅकरने केले. तीन मिनिटांत बिटकॉइनबाबत दोन ट्विट (Tweets on Bitcoin) करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केलेल्या घोषणेमुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळेत त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे ट्विट रात्री उशिरा दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. मात्र, आता नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल रिस्टोअर करण्यात आले असून ते ट्विट डिलीट करण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट पीएमओ इंडियाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, पंतप्रधानांचे ट्विटर हँडल @narendramodi खाते काही काळासाठी हॅक झाले होते. हे प्रकरण ट्विटरपर्यंत पोहोचले आणि लगेचच खाते सुरक्षित करण्यात आले आहे. या कालावधीत केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करण्यात यावे, असे पीएमओकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वीही झाले होते अकाउंट हॅक –

यापूर्वीही पंतप्रधान मोदींचे व्यैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. हॅकरने कोविड-19 रिलीफ फंडासाठी डोनेशन म्हणून बिटकॉइनची मागणी केली होती. मात्र, तत्काळ हे ट्विट्स डिलीट करण्यात आले. कोविड-19 साठी निर्माण करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडात देणगी द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिगत वेबसाइटच्या या ट्विटर अकाउंटवर करण्यात आले होते.

काय आहे बिटकॉइन

बिटकॉइनची सुरुवात 2009 मध्ये झाली होती. बिटकॉइनची किंमत सतत वाढत आहे. ही एक प्रकारची डिजिटल करंसी आहे. बिटकॉइनची सुरुवात एलियस सतोशी नावाच्या एका व्यक्तीने केली होती. भारतात देखील गुप्तपणे बिटकॉइन ट्रेडिंग केली जाते. मात्र, सरकारने याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. बिटकॉइन ट्रेडिंग डिजिटल वॉलेटद्वारे होते.

यांचेही झाले होते ट्विटर खाते हॅक –

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क आणि उद्योजक जेफ बेझोस यांच्यासह जगातील अनेक बड्या उद्योजक आणि नेत्यांची ट्विटर खाते हॅक झाले होते. हे हॅकिंग बिटकॉइन स्कॅम होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram