नटराज करंडक २०२१ चा मान ‘लेखक’ ने पटकावला
यावर्षी नटराज करंडक चे प्रथम पारितोषिक हरिभाऊ देशपांडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रभाकर देशपांडे स्मृतिप्रीत्यर्थ जाहीर करण्यात आले होते.
नटराज करंडक २०२१ चा मान ‘लेखक’ ने पटकावला
यावर्षी नटराज करंडक चे प्रथम पारितोषिक हरिभाऊ देशपांडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रभाकर देशपांडे स्मृतिप्रीत्यर्थ जाहीर करण्यात आले होते.
बारामती वार्तापत्र
नटराज नाट्य कला मंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बारामती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने खा. शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा नटराज करंडक २०२१ चे मानकरी यावर्षी ठाणे येथील कल्लाकार्स थिएटरच्या लेखक या एकांकिकेने पटकावला आहे.
प्रथम क्रमांक सोबतच उत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री, सर्वो त्कृष्ट अभिनय पुरुष, सर्वोत्कृष्ट नवीन लेखन, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना, सर्वो त्कृष्ट पार्श्वसंगीत तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्य ही पारितोषिके त्यांना मिळाली आहेत.
नटराज करंडकचे यावर्षीचे ३६ वे वर्ष होते.
(दि.११) रोजी सायंकाळी सात वाजता वसंतराव पवार नाट्यगृहात सुरु झालेल्या स्पर्धा सलग १२ तास चालून (दि.१२) रोजी सकाळी ७ वाजता पूर्ण झाल्या नंतर निकाल जाहीर करण्यात आला.
स्पर्धेमध्ये बारामती, पुणे, मुंबई, नाशिक, अंबरनाथ, सातारा आदी ठिकाणाहून एकूण अकरा संघ सहभागी झाले होते. यामध्ये सांधिक प्रथम क्रमांक लेखक या एकांकिकेसाठी कल्लाकार्स थिएटर्स ठाणे यांनी पटकाविले, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आमचे आम्ही, पुणे या संस्थेच्या आय ग्री टू यांनी मिळविले तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रंग पंढरी, पुणे या संस्थेच्या विशद या एकांकिकेने पटकावले. याच
बरोबर उत्तेजनार्थ सांघिक पारितोषिके अनुक्रमे अंबरनाथ येथील आत्रेया संस्थेच्या मृगमोक्ष व संवाद नाट्यसंस्था सातारा या संस्थेच्या झोंबी या एकांकिकेने मिळविले.
यावर्षी नटराज करंडक चे प्रथम पारितोषिक हरिभाऊ देशपांडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रभाकर देशपांडे स्मृतिप्रीत्यर्थ जाहीर करण्यात आले होते.
प्रभाकर देशपांडे यांच्या नाट्यक्षेत्रातील स्मृतिप्रीत्यर्थ हरिभाऊ देशपांडे ट्रस्ट यांच्या वतीने सदर पारितोषिक दरवर्षी देण्याचे त्यांनी या वर्षी जाहीर केले आहे.