स्थानिक

शहीद बिपीन रावत यांना सैनिक संघटना च्या वतीने श्रद्धांजली

सिडीएस बिपीन रावत यांचे कार्य प्रत्येक सैनिकां साठी प्रेरणादायी होते

शहीद बिपीन रावत यांना सैनिक संघटना च्या वतीने श्रद्धांजली

सिडीएस बिपीन रावत यांचे कार्य प्रत्येक सैनिकां साठी प्रेरणादायी होते

बारामती वार्तापत्र

शहीद सिडीएस बिपीन रावत व त्यांच्या पत्नी आणि इतर शहीद अधिकारी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यामुळे बारामती येथील जय जवान आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने शहरातील भिगवण चौक येथील हुतात्मा स्तंभ येथे (रविवार 12 डिसेंम्बर) श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी जय जवान आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निबाळकर ,आजी माजी सैनिक संघटना फलटण अध्यक्ष ज्ञानदेव नाळे व माजी संघटना अध्यक्ष सोपानराव बर्गे व राज्यातील इतर माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

सिडीएस बिपीन रावत यांचे कार्य प्रत्येक सैनिकां साठी प्रेरणादायी होते व प्रत्येक भारतीयांच्या मनात देशप्रेम म्हणजे काय हे रावत यांनी दाखविलयाचे अध्यक्ष हनुमंत नींबाळकर यांनी सांगितले.

देशासाठी कोणताही आनंदाचा कार्यक्रम असेल किंवा श्रद्धांजली चा कार्यक्रम असो किंवा माजी सैनिक यांचे शासन दरबारी विविध प्रश्न असो बारामती जय जवान आजी माजी सैनिक संघटना राज्यात अग्रेसर असते ही देशासाठी भूषणावह गोष्ट असल्याचे अनेक व्यक्त्यांनी सांगितले

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button