“शिक्षण क्षेत्रातील कर्तव्याचा महामेरू” प्राचार्य डॉ. भरत शिंदे
'लोक माझे सांगाती' हे मा. शरद पवार यांचे पुस्तक सप्रेम भेट देऊन करण्यात आला.
“शिक्षण क्षेत्रातील कर्तव्याचा महामेरू” प्राचार्य डॉ. भरत शिंदे
‘लोक माझे सांगाती’ हे मा. शरद पवार यांचे पुस्तक सप्रेम भेट देऊन करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
” ग्रामीण भागातील मुले व विशेष करून मुली शिकल्या पाहिजेत, त्यांनी जागतिक स्पर्धेत उतरले पाहिजेत व तेथे त्यांनी उत्तम यश प्राप्त केले पाहिजे यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील पवारसाहेबांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
पुणे, मुंबईसह दिल्लीमध्येही मराठी मुलांचा स्पर्धा परीक्षेत टक्का वाढला पाहिजे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. अशा होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी ते ठामपणे उभा राहून त्यांना मदत करतात.
या पार्श्वभूमीवर ते शिक्षण क्षेत्रातील कर्तव्याचा महामेरू ठरतात ” असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने आयोजित ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’ च्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते. स्पर्धेचे हे २०वे वर्ष आहे.
आपल्या भाषणात त्यांनी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’ च्या गेल्या १९ वर्षांचा आढावा घेऊन या स्पर्धेचे सांस्कृतिक योगदान अधोरेखित केले. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्याचा आढावा घेऊन राज्य, राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील साहेबांचे हिमालयाचे उंचीचे स्थान अधोरेखित केले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला डॉ. उत्कर्षा ठाकरे, डॉ. जयश्री बागवडे, डॉ. परिमिता जाधव या सावित्रीच्या लेकींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. श्रीराम गडकर यांनी केले. प्राथमिक फेरीतील परीक्षक डॉ. जयश्री बागवडे, प्रा. शिवाजी टकले, प्रा. विजय काकडे, प्रा.उदय पाटील, डॉ. आनंदा गांगुर्डे या परीक्षकांचा सत्कार प्राचार्य डॉ.भरत शिंदे, पर्यवेक्षक डॉ. उत्कर्षा ठाकरे व IQAC समन्वयक प्रा. नीलिमा पेंढारकर यांच्या हस्ते करण्यात आला.
अंतिम फेरीतील परीक्षक डॉ. परिमिता जाधव, प्रा. बापू खाडे, प्रा.नंदकुमार खळदकर यांचा सत्कार ‘लोक माझे सांगाती’ हे मा. शरद पवार यांचे पुस्तक सप्रेम भेट देऊन करण्यात आला. सर्व उपस्थितांचे आभार प्रा. सुनील डिसले यांनी मानले. ऑनलाइनच्या माध्यमातून कनिष्ठ व वरिष्ठ विभागातून ६८ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.