दुर्दैवी घटना ;देऊळगावगाडा ता. दौंड येथील एमपीएससी नैराश्यातून विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
शुक्रवारी (दि. 17) दुपारी 4 वाजेच्या सुमारास केल्याची प्राथमिक माहिती
दुर्दैवी घटना ;देऊळगावगाडा ता. दौंड येथील एमपीएससी नैराश्यातून विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
शुक्रवारी (दि. 17) दुपारी 4 वाजेच्या सुमारास केल्याची प्राथमिक माहिती
बारामती वार्तापत्र
देऊळगावगाडा ता. दौंड येथील एमपीएससीची परीक्षा देत असणार्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मल्हारी नामदेव बारवकर (वय-25) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि. 17) दुपारी 4 वाजेच्या सुमारास मल्हारीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मल्हारीने एमपीएससीच्या परीक्षेचे तीन पेपर दिले होते. एमपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करीत असल्याने या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या घटनेची फिर्याद मल्हारी बारवकरचे चुलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी पाटस पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेची माहिती हवालदार भानुदास बंडगर, पोलीस नाईक, घनश्याम चव्हाण, पोलीस शिपाई समीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा तपास पाटस पोलीस करीत आहेत.