मुस्लिम बँकेच्या निवडणूकीत आवामी महाज पॅनेलचा पुन्हा संधी
बारामतीतून आलताफ सय्यद बहुमताने विजयी
मुस्लिम बँकेच्या निवडणूकीत आवामी महाज पॅनेलचा पुन्हा संधी
बारामतीतून आलताफ सय्यद बहुमताने विजयी
बारामती वार्तापत्र
दि मुस्लिम को-ऑप बँकेची पंचवार्षिक निवडणूक 2021-26 नुकतीच पार पडली. या निवडणुकीत एकुण तीन पॅनेल निवडणूकीच्या रिंगणात होते. मात्र, सभासदांनी डॉ.पी.ए.इनामदार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेला आवामी महाज पॅनेलवर विश्र्वास दाखवीत बहुसंख्य मताधिक्य देवून 17 उमेदवारांना निवडून दिले.
बारामती येथुन आवामी महाज पॅनेलतर्फे आलताफ हैदरभाई सय्यद इतर मागासवर्गीय गटातून 4 हजार 158 मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या चाहत्यांनी मिरवणुक काढून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
मुस्लिम बँकेने कोरोना काळात सुद्धा 3 कोटीचा नफा मिळविलेला आहे. 650 कोटीच्या ठेवी व 350 कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे. बँकेचा उत्तमोत्तम कारभार पाहुन पुन्हा एकदा सभासदांनी आवामी महाज पॅनेलला भरघोस मताधिक्य देवून बँकेचा कारभार पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.
अवामी महाज पॅनेलच्या उमेदवारांना पडलेली मते :-
(1) इनामदार पीरपाशा हुसैनी अब्दुल रज्जाक (4334)
(2) इनामदार सय्यद आली रजा अब्दुल रज्जाक (4130)
(3) इनामदार तनवीर पीरपाशा (4109)
(4) खालिफा महमंद जाकीर अय्युब (4033)
(5) खान अफजल कादर (4076)
(6) खान खुदादोस्त मुस्तेजाब (4106)
(7) खान लुकमान हाफिज्जुद्दीन (4248)
(8) सैय्यद मोहम्मद गौस शेर अहमद (4207)
(9) सय्यद सईद बाबासाहेब (4181)
(10) शेख अय्युब ईलाहीबक्ष (4220)
(11) शेख इकबाल इस्माईल (4027)
(12) शेख मुनव्वर रहेमतुल्लाह (3939)
(13) मनीयार अंजुम सलीम (4302)
(14) तांबोळी आयेशा फिरोज (4052)
(15) सय्यद आल्ताफ हैदरभाई (4158)
(16) शेख समीर मोईद्दीन (4313)
(17) तडवी दानिश रौनकखान (4409)
बारामतीतून विजयी झालेले उमेदवार :- सय्यद आल्ताफ हैदरभाई (4158)