बारामती नगरपरिषदेद्वारा माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांचे विजेते, स्वच्छता दूत व पर्यावरण दूत यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
67 विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
बारामती नगरपरिषदेद्वारा माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांचे विजेते, स्वच्छता दूत व पर्यावरण दूत यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
67 विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेद्वारा माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा गुणगौरव सोहळा व बारामती शहरात पर्यावरण संवर्धनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पर्यावरण दूत शहर स्वच्छतेत विशेष योगदान देणारे स्वच्छता दूत, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात उलेखनीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच शहरात स्वच्छता मोहीम राबविणेकामी प्रत्येक प्रभागात बँड अॅम्बेसेडरची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या ठिकाणी मा.अध्यक्षा सौ.पौर्णिमाताई तावरे, मा.उपाध्यक्ष श्री अभिजीत जाधव, मा.गटनेते श्री सचिन सातब, मा. आरोग्य सभापती श्री सूरज सातब ,मा.मुख्याधिकारी श्री महेश रोकडे तसेच नगरपरिषदेचे सन्माननीय पदाधिकारी,नगरपरिषदेचे अधिकारीब कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली.
यानंतर पर्यावरण संवर्धन व स्वच्छता या विषयावर शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच हरित शपथ व स्वच्छतेची शपथ उपस्थितांना देण्यात आली.
माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सन २०२०-२१ व सन २०२१-२२ ला आयोजित निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गडकिल्ले स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आकाशकंदिल स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांचा पटक, प्रमाणपत्र देवून असे 67 विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
बारामती शहरात पर्यावरण संवर्धनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पर्यावरण दूतांचा वृक्ष व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला ,शहर स्वच्छतेत विशेष योगदान देणारे स्वच्छता दूतांचा वृक्ष व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी करणा-या आरोग्य कर्मचाऱ्यांचा वृक्ष व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तसेच शहरात स्वच्छता मोहीम राबविणेकामी प्रत्येक प्रभागात एक बैंड अॅम्बेसेडरची निवड करण्यात आली. नागरिकांना माझी वसुंधरा अभियानात वृक्ष लावण्याचा संकल्प व शहाराच्या स्वच्छतेकामी वैयक्तिक / सामूहिक योगदान देण्यासाठी आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजना करिता बारामती नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच बारामती नगर परिषदेच्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली.