राज्यातील शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण
विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राज्यातील शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण
विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मुंबई -प्रतिनिधी
राज्यात ओमायक्रॉनची धास्ती वाढत असली तरी ऑनलाईन – ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू ठेवल्या जातील. मात्र, राज्यातील शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
नवी मुंबईतील घणसोली येथे १८ शालेय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याच्या वावड्या उठल्या आहेत. याबाबत शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांना विचारले असता, एखाद्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळून आले तर, काय करायचे हे स्थानिक प्रशासन ठरवणार आहे. त्यासाठी एसओपी तयार केल्या आहेत. त्यानुसार, शाळा सुरू ठेवायच्या की बंद, हे ठरेल, असे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.