आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाच्या रद्द केलेल्या परीक्षांबाबत चौकशी होणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे
न्यासाच्या बाबतीत त्यांना उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतरच निवड करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाच्या रद्द केलेल्या परीक्षांबाबत चौकशी होणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे
न्यासाच्या बाबतीत त्यांना उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतरच निवड करण्यात आली.
मुंबई –प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाच्या रद्द केलेल्या परीक्षा ( Health Department Exam ) प्रकरणाची चौकशी करण्याबाबत प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत ( Maharashtra Council Winter Session 2021 ) प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत सरकार गंभीर असून गरज भासल्यास या पूर्ण प्रकरणाची माजी निवृत्त मुख्य सचिवांद्वारे चौकशी करण्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे..? – प्रविण दरेकर
आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाच्या रद्द केलेल्या परीक्षा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सप्टेंबरमध्ये विचारणा करण्यात आली होती. तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात येईल का, ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का, असे प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर ( Opposition Leader Pravin Darekar ) यांनी उपस्थित केले. तसेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. एका दिवशी दोन परीक्षा घेतल्या जातात. आपल्याकडे माहिती नाही का, असा खडा सवाल ही उपस्थित केला.
पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे
यावर बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, मागच्या सरकारकडून ओएमआर पद्धतीने परीक्षा घ्यावी असा निर्णय घेण्यात आला, तोच निर्णय आम्ही घेतला. यासाठी 18 कंपन्या आल्या होत्या त्यातील पाच कंपन्या अंतिम होऊन ज्या कंपनीची 10 लाख परीक्षा घेण्याची क्षमता आहे, त्यांची निवड करायचे ठरले. न्यासाच्या बाबतीत त्यांना उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतरच निवड करण्यात आली. निवेदेची पक्रिया व्यवस्थित पार पाडून निवड करण्यात आली आहे. तसेच गरज पडल्यास निवृत्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली याची चौकशी करता येईल, असेही टोपे यांनी सांगितले.