इंदापूरात पोलिसांची गुटख्यावर कारवाई ; ३२ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
दोघांवर गुन्हा दाखल
इंदापूरात पोलिसांची गुटख्यावर कारवाई ; ३२ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
दोघांवर गुन्हा दाखल
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोलनाक्यावरुन पोलीसांच्या नाकाबंदीस न जुमानता भरधाव वेगात निघून चाललेल्या अशोक लेलॅन्ड कंपनीच्या चारचाकी वाहनांचा पाठलाग करुन इंदापूर पोलीसांनी त्यामधील २० लाख ६६ हजार ८० रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व गुन्ह्यात वापरलेले १२ लाख रुपयांचे वाहन असा ३२ लाख ६६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.दोघा जणां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.दि.२२ डिसेंबर रोजी रात्री एक वाजता ही कारवाई करण्यात आली.
गणेश आबासाहेब चव्हाण (वय २५ वर्षे,रा.शेटफळ ता.मोहोळ.जि सोलापूर) चंद्रकांत क्षीरसागर रा. बारामती,जि.पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. चव्हाण यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस नाईक मनोज गायकवाड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर,फौजदार दाजी देठे,पोलीस नाईक मनोज गायकवाड,पोलीस शिपाई फडणीस यांनी ही कारवाई केली.
सदरील कारवाईत ४ लाख ८९ हजार ६०० रुपयांची माणिकचंद गुटख्याची प्रक्रिया केलेली सुपारी व २, लाख ४ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू,२ लाख १६ हजार रुपयांची विमल गुटख्याची प्रक्रिया केलेली सुपारी,२ लाख ६९ हजार २८० रुपयांची सुगंधी तंबाखू, व १० लाख २१ हजार ६८० रुपयांचा पान मसाला व १२ लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले आहे.