परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतरही जे एसटी कर्मचारी कामावर परतले नाहीत, त्यांच्यावर आजपासून बडतर्फीच्या कारवाई

दोन दिवसांत कामावर हजर होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतरही जे एसटी कर्मचारी कामावर परतले नाहीत, त्यांच्यावर आजपासून बडतर्फीच्या कारवाई

दोन दिवसांत कामावर हजर होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते.

मुंबई :प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण  मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. यादरम्यान अनेकांनावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र जे कर्मचारी कामावर परततील त्यांच्यावरील सर्व कारवाया मागे घेण्यात येतील, असे अश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या दोन दिवसांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कामावर परतले आहेत. कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी 23 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्याने जे एसटी कर्मचारी अद्यापही कामावर परतले नाहीत, त्यांच्यावर आजपासून पुन्हा एकदा करवाईचा बडगा उगारण्यात येणार असून त्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे.

102 आगार अजूनही बंद

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील 250 आगारांपैकी 148 आगार काही प्रमाणात सुरू आहेत, तर 102 आगार अद्याप पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारी संप मागे घेण्याची घोषणा एसटी महामंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर केली होती. यावेळी निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या या प्रकरच्या कारवाया मागे घेण्यावर देखील चर्चा झाली. निलंबन मागे घेतले जाईल, मात्र दोन दिवसांमध्ये कामावर रुजू व्हा असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. मात्र अंतिम मुदत संपल्यानंतर देखील अनेक कर्मचारी कामावर गैरहजर आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram