क्राईम रिपोर्ट

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील तुकाराम सुपेच्या घरून आणखी पाच लाखांची रोकड जप्त

सीबीआयची गरज नसल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील तुकाराम सुपेच्या घरून आणखी पाच लाखांची रोकड जप्त

सीबीआयची गरज नसल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले

प्रतिनिधी

टीईटी परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त यांच्या तुकाराम सुपेच्या घरून आणखी पाच लाखांची रोकड पोलिसांनी  जप्त केली आहे. आणखी रक्कम हाती लागेल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत तब्बल 33 लाख रुपये हस्तगत केले होते. यामध्ये सुपे यांच्या मुलगी व जावयाकडे 1 कोटी 59 लाख तसेच 44 प्रकारचे वेगवेगळे दागिने असा 2 कोटींहून अधिकचा ऐवज जप्त केला

सुपेच्या घरी कोट्यावधींचं घबाड

आतापर्यंत 3 कोटी 88 लाख जप्त केले आहेत.  यात पहिल्या धाडीत 88 लाख जप्त केले आहेत, दुसऱ्या धाडीत दोन कोटी रोकड आणि 70 लाखाचं 1.5 किलो सोनं जप्त केले आहे. तर तिसऱ्या धाडीत 33 लाख जप्त करण्यात आले आहेत. आज पुन्हा पाच लाख पोलिसांनी हस्तगत केले आहेत. परीक्षा घोटाळा प्रकरणात आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे, माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, बंगळुरूमधून जी.ए टेक्नॉलॉजीचा संचालक प्रीतेश देशमुखसह बीडमधून संजय सानप या मुख्यसूत्रधारांसह सौरभ त्रिवेदी याला पोलिसांनी अटक केली आहे.

विरोधकांची CBI चौकशीचीही मागणी

शिक्षक पात्रता भरती घोटाळ्याच्या निष्पक्षपणे चौकशी व्हावी, तसेच याच्या मूळापर्यंत जावे. यासाठी हा तपास CBI कडे द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा घोटळा केवळ अधिकाऱ्यांच्यापर्यंतचा मायादित नसून तो मंत्रालयापर्यंत पोहचलेला असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. मात्र महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाची योग्य पद्धतीने तपास करत आहेत त्यामुळे सीबीआयची गरज नसल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या पोलिसांचा प्रयत्न
एका बाजूला पेपर फुटीमुळे विरोधकांनी सरकारला घेरलंय. तर दुसरीकडे पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आता आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात हे पाहावं लागेल.

Related Articles

Back to top button