महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. त्यामुळे आता अनेकांना कोरोनाची चिंता सातवत आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. त्यामुळे आता अनेकांना कोरोनाची चिंता सातवत आहे.
अहमदनगर:प्रतिनिधी
महसूलमंत्री बाळासाहेब थोरतांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली टेस्ट करून घ्यावी अस अहवान त्यांनी सोशल मीडियावर केलय.
कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी थोरात अनेक कार्यक्रमांत
थोरतांचा कोरोना रिपोर्ट येण्याआधी त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावलीय. बुधवार दिनांक 29 तारखेला बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच उदघाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेय. त्यानंतर त्यांनी कर्डीले यांच्या मुलाच्या लग्नाला निमित्त घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, काँग्रेस आमदार लहू कानडे उपस्थित होते.
किर्डिलेंच्या विवाहसोहळ्यात अनेक नेते
तर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले याच्या विवाहासाठी भाजपचे अनेक नेते नगरमध्ये आले होते. या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या दोन दिग्गज नेते पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडालीये. भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यां दोघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन हे हेलिकॉप्टरने नगरमध्ये आले. हे हेलिकॉप्टर पोलिस परेड मैदानावर उतरताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे हेलिकॉप्टरच्या दिशेने गेले. मात्र अवघ्या काही क्षण थोरात यांनी फडणवीस, पाटील आणि महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली, व त्याच हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र त्यांनी कार्यक्रमांना लावलेली हजेरी आणि त्यानंतर कोरोनाचा आलेला रिपोर्ट यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.