माळेगाव पाँलिटेक्निकच्या ६५ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड
बजाज ऑटो लि. हि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असल्याने या कंपनीमधील कामाचा अनुभव सर्वोत्तम मानला जातो,
माळेगाव पाँलिटेक्निकच्या ६५ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड
बजाज ऑटो लि. हि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असल्याने या कंपनीमधील कामाचा अनुभव सर्वोत्तम मानला जातो,
बारामती वार्तापत्र
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि अँड इंजिनिअरिंग माळेगाव बु. येथे बजाज ऑटो लि.,पुणे या कंपनीच्यावतीने, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील डिप्लोमाच्या अंतिम वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेले ऑटोमोबाईल,मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चाचणी व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
बजाज ऑटो लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन चाचणीद्वारे गुणवत्तेवर आधारित ऑटोमोबाईलचे गणेश आटोळे, सुरज कदम, अभिजित भोसले, सुजित सातपुते, ऋषिकेश धुमाळ, केतन जाधव, स्वराज राऊत, अनिकेत चव्हाण, सौरभ देशमुख, आकाश पवार, ओंकार पवार, प्रतीक जाधव, शिवरत्न माळी, प्रषिक कांबळे मेकॅनिकलचे शुभम हांडे, ओंकार शिंदे, विश्वजीत गायकवाड, प्रसाद ननवरे, केशव क्षीरसागर, यश धोत्रे, यश क्षीरसागर, सागर कांबळे, प्रतिमा मोरे, गौरव भंडलकर, हर्षद लवटे, सागर सणस, अजित गवारे, अभय भोसले, श्रेयश भोईटे, सिद्धार्थ ढगे, ऋषिकेश खरात इलेक्ट्रिकलचे प्रतापसिंह आटोळे, गौरी कुतवळ, जीवन मोरे, अभिजित कराळे, आदित्य जाधव, हरीश पाचपुते, माउली गुटल, अभिषेक पवार, साक्षी मसुगडे, शुभम मोरे, सारंग जाधव, चेतना नलावडे, अभिजीत घोळवे, प्रज्वल परकाळे, मयूरी कोकरे, वैष्णव गोफणे, कृष्णा परकाळे, रविराज सातव, अनिकेत निंबाळकर, राकेश झगडे, प्रतीक्षा वणवे, अमोल तुडमे, शिवाजी बनकर, रोहित भोसले, सुरज सातव, हर्षद चोरमले तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशनचे केतन हगारे, दिव्या ओमासे, अजिंक्य कदम, शुभांगी तोमसकर, यशराज बेंद्रे, रोहन बनकर, अल्फीया तांबोळी, गणेश धवडे या विद्यार्थ्यांची निवड केली. कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी श्री विकास शुक्ला यांनी संस्था विद्यार्थ्यांना देत असलेल्या सुविधाबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यामध्ये अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर वाढत असल्याने इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
बजाज ऑटो लि. हि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असल्याने या कंपनीमधील कामाचा अनुभव सर्वोत्तम मानला जातो, या संधीचा फायदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे संस्थेचे प्राचार्य प्रा. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले. कोविड महामारीच्या काळामध्ये शासकीय नियमांचे पालन करीत सर्वच कंपन्यांनी आपले उत्पादन चालू केले असल्याने नामांकित कंपन्या संस्थेमध्ये मुलाखतीसाठी येत आहेत, डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत तसेच यापूर्वी आदित्य रसाळ या इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजिच्या विद्यार्थयांची हैद्राबाद येथील हायरँडिअस इन्फोसेक या कंपनीमध्ये निवड झाली असल्याचे संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब तावरे, विश्वस्त श्री वसंतराव तावरे, श्री अनिल जगताप, श्री महेंद्र तावरे, श्री रामदास आटोळे, श्री गणपत देवकाते, श्री रविंद्र थोरात, सौ. सिमा जाधव, सौ. चैत्राली गावडे, संस्थेचे सचिव श्री प्रमोद शिंदे तसेच दि. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री बन्सीलाल आटोळे आणि सर्व संचालक मंडळ यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस संस्थेतर्फे शुभेच्छा दिल्या.