एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आरबीआयने सांगितले प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी वर 21 रुपये लागणार चार्ज
आरबीआयने सांगितले होते की, जास्त इंटरचेंज चार्ज आणि सामान्य खर्चात वाढ झाल्यामुळे RBI ने व्यवहारावरील शुल्क 21 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली

एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, आरबीआयने सांगितले प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी वर 21 रुपये लागणार चार्ज
आरबीआयने सांगितले होते की, जास्त इंटरचेंज चार्ज आणि सामान्य खर्चात वाढ झाल्यामुळे RBI ने व्यवहारावरील शुल्क 21 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली
मुंबई,प्रतिनिधी
आजपासून 1 जानेवारी 2022 एटीएम मधून पैसे काढणे महाग झाले आहे. आरबीआयच्या नियमांअंतर्गत आता ग्राहकांना निश्चित मर्यादेनंतर एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. 1 जानेवारीपासून देशातील सर्व बँकांनी एटीएम चार्जेस 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ठराविक मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढल्यानंतर तुम्हाला दरवेळी 21 रुपये मोजावे लागतील. याशिवाय ग्राहकांना जीएसटी द्यावा लागेल. अगोदर ही रक्कम 20 रुपये होती, ती आजपासून 21 रुपये करण्यात आली आहे.
हे आहे नवे अतिरिक्त शुल्क
1 जानेवारी म्हणजेच आजपासून ग्राहकांनी मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडल्यास 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति व्यवहार द्यावे लागतील. आरबीआयने सांगितले होते की, जास्त इंटरचेंज चार्ज आणि सामान्य खर्चात वाढ झाल्यामुळे RBI ने व्यवहारावरील शुल्क 21 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे.
ग्राहक त्यांच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला 5 मोफत व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहार) करू शकतील. ते मेट्रो शहरांमधील इतर बँकांच्या एटीएममधून तीन आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहार करू शकतील. याशिवाय, आरबीआयने बँकांना सर्व केंद्रांमधील आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरून 6 रुपये करण्याची परवानगी दिली आहे.
डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारीपासून डेबिट क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम लागू करणार आहे. तुम्ही जर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर नवीन वर्षात ऑनलाइन कार्ड पेमेंटबाबत नियम बदलत आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सुरक्षेबाबत हा नियम लागू केला जाणार आहे. RBI ने ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित बनवण्यासाठी सर्व वेबसाइट्स आणि पेमेंट गेटवे द्वारे स्टोअर करण्यात आलेल्या ग्राहकांच्या डेटाला हटवण्यास आणि याजागी व्यवहारासाठी एन्क्रिप्टेड टोकन चा वापर करण्यास सांगितले आहे.