माळेगावात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
या कार्यक्रमाचे आयोजन बि.के.गृप व रूद्र प्रतिष्ठानचे निलेश लोणकर यांनी केले.
माळेगावात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
या कार्यक्रमाचे आयोजन बि.के.गृप व रूद्र प्रतिष्ठानचे निलेश लोणकर यांनी केले.
बारामती वार्तापत्र
देशात स्री शिक्षणाचा पाया रचणा-या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे असे प्रतिपादन माजी सभापती संजय भोसले यांनी केले.
बि.के.गृप व रूद्र प्रतिष्ठान यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे व माजी सरपंच दीपक तावरे यांनी केले.यावेळी माजी सरपंच जयदीप तावरे, उद्योजक आप्पा लोखंडे, रिपाइंचे विश्वास भोसले, प्रविण बनसोडे,अॅड.विशाल मापटे,सागर मोटे,दादा जराड,विशाल घोडके,कुलदिप तावरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन बि.के.गृप व रूद्र प्रतिष्ठानचे निलेश लोणकर, शुभम रासकर, योगेश तावरे, विकास रासकर, शशिकांत तावरे, योगेश रासकर,पिनु होले,संपत रासकर यांनी केले. दरम्यान नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी कामगार संघटनेचे सुरेश सावंत, राजु शेख,दादा ठोकळ, विकास जाधव, सेहवाग सोनवणे, रणजित जाधव, अनिल नाईक, कुंडलिक येळे, रेश्मा मांढरे, शितल चव्हाण यांनी अभिवादन केले.