टेक्निकलचे विद्यार्थी झाले लसवंत
मुलांच्या लसीकरणासाठी पुणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
टेक्निकलचे विद्यार्थी झाले लसवंत
मुलांच्या लसीकरणासाठी पुणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज मध्ये आज (दि:४) रोजी मोठ्या उत्साहात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू झाले.
पुणे जिल्ह्यात काल सोमवारपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या लसीकरण साठी केंद्र सरकारने ३ जानेवारी पासून सुरू करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
मुलांच्या लसीकरणासाठी पुणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.नाझीरकर यांनी विद्यार्थी व पालक यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा व या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.उपस्थित डॉ.व आरोग्य कर्मचारी यांचे स्वागत विद्यालयाचे प्रा. झाकीर शेख यांनी केले तर सूत्रसंचालन सुदाम गायकवाड यांनी केले.