क्राईम रिपोर्ट

वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आलेल्या कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते.

वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आलेल्या कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते.

क्राईम;बारामती वार्तापत्र

वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत आलेल्या कालीचरण बाबाला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बाबाला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातील जाहीर कार्यक्रमात कालीचरण बाबाने दोन समाजात तेढ निर्माण करणारे  वक्तव्य केले होते. या प्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी कालीचरणला छत्तीसगडमधील रायपूर येथून मंगळवारी ताब्यात  घेतले. त्याला पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात हजर केले.

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात समस्त हिंदु आघाडीच्या वतीने शिवप्रतापदिनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात कालीचरण महाराजाने दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Back to top button