ज्याचें दोन डोस पूर्ण त्यांनाच बारामती नगरपालिकेत प्रवेश
ओमिक्रॅानच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक उपाययोजना....

ज्याचें दोन डोस पूर्ण त्यांनाच बारामती नगरपालिकेत प्रवेश
ओमिक्रॅानच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक उपाययोजना….
मास्क घालूनच नगरपालिकेत प्रवेश करावा.
बारामती वार्तापत्र
ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनाच आता बारामती नगरपालिकेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान याची अंमलबजावणी आज (दि:५) पासून करण्यात आली आहे.
ओमिक्रॅान वाढता संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी काल परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहे. अशांनाच खाजगी व शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश द्यावा अशा सूचना माननीय जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या.
दरम्यान दिलेल्या आदेशानुसार आज बारामती नगरपालिका मद्ये आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहे. त्यांनाच बारामती नगरपालिकेत प्रवेश दिला जात आहे. मास्क घालूनच नगर पालिकेत प्रवेश करावा असे आव्हान देखील मुख्याधिकारी महेश रोकडे केले आहे.