माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील वाढला मुक्काम; पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार
मात्र, काही कारणामुळे अर्जावर सुनावणी ( Anil Deshmukhs bail plea hearing ) होऊ शकली नाही.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील वाढला मुक्काम; पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार
मात्र, काही कारणामुळे अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही.
मुंबई-प्रतिनिधी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील मुक्काम वाढणार आहे. 100 कोटी कथित वसुली प्रकरणात अटक केल्यानंतर माजी गृहमंत्री देशमुख हे आर्थर रोड तुरुंगामध्ये आहेत. अनिल देशमुख यांनी 4 जानेवारी रोजी जामीनकरिता मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यात केला होता. आज सुनावणी होऊ शकली नसल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, काही कारणामुळे अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यांच्या जामिन अर्जावर 11 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
जामीन अर्जाला ईडीचा विरोध
अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला आहे. अनिल देशमुख यांनी जामिनासाठी दाखल केलेले अर्ज हा अवैध असल्याचे ईडीने सत्र न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. ईडीच्या म्हणण्याप्रमाणे 60 दिवसांच्या आत आरोप पत्र चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मागता येणार नाही, असे ईडीने मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे.
अनिल देशमुख यांचा मेहुणा आणि मुलगादेखील सहआरोपी
गेल्या 65 दिवसांपासून अनिल देशमुख हे तुरुंगामध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए ईडीने 7000 पानांचे पुरवणी आरोपपत्रदेखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांनादेखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखविले आहे.