जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई;यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुन्हा निर्बंध लागू केले
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई;यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुन्हा निर्बंध लागू केले
दौंड-प्रतिनिधी
कोरोनापासून बचावासाठी मास्कचा उपयोग आवश्यक आहे.त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विप्षाणूचा संसर्ग वाढत असल्याने थुंकणाऱ्यांना जागेवरच 1000 रुपये दंड आकारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पारित केले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असलातरी नवीन ओमिक्रॉन विषाणूचे संकट ओढावले आहे.त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर कारवाई केली जाणार आहे.राज्यासह देशभरात ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रसार वाढू लागला आहे. राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत.त्या पार्श्वभूमीवर उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुन्हा निर्बंध लागू केले असून 50 टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे.
मॉल,आस्थापने,सिनेमागृह,लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहे.ओमिक्रॉनचा प्रसार टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी यवत पोलिसांनी यवत गाव व परिसरात नागरिकांना दुचाकी व चारचाकी चालवताना तोंडाला मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन करण्यात आले.ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लागू केले आहे.त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.मास्कचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.