विना मास्क फिरत असणाऱ्या तीस व्यक्तींवर बारामती शहर पोलीस यांची दंडात्मक कारवाई

विना मास्क फिरत असणाऱ्या तीस व्यक्तींवर बारामती शहर पोलीस यांची दंडात्मक कारवाई
फाईन गोळा करणे हे टारगेट नसून. लोकांमध्ये जागृती व्हावी अवेअरनेस यावा.
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलिसांतर्फे काल विना मास्क एकूण तीस लोकांच्यावर कारवाई पंधरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सर्व जनतेला पुन्हा एकदा आवाहन आहे की सामाजिक अंतर ठेवा तोंडाला मास्क लावावा आणि शनि टायझर वापर करावा.
जानेवारी महिन्यापासून कोरोना चा नवा विषाणुच्या संसर्गामुळे कोरोनाचे रुग्णसंख्या नव्याने वाढु लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यात कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत.
त्यानुसार बारामती शहर पोलिसांतर्फे विना मास्क फिरत असणाऱ्या तीस व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडुन पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारून दिवसात पंधरा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना आणि गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क चा वापर करावा, शक्यतो गर्दीत जाणे टाळावे, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे व नियमांचे पालन करावे. विना मास्क व नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्यात येईल.
त्यामुळे नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची व गावाची आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक यांनी केले आहे.