स्थानिक

हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब याचा नाभिक संघटनेच्या वतीने निषेध

फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा: बारामती तालुका नाभिक संघटनेच्यावतीने शहर पोलीस स्टेशनला निवेदन.

हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब याचा नाभिक संघटनेच्या वतीने निषेध

फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा: बारामती तालुका नाभिक संघटनेच्यावतीने शहर पोलीस स्टेशनला निवेदन.

बारामती वार्तापत्र

नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल
हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब याचा बारामतीत जाहीर निषेध करत त्याच्यावर फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा यासंदर्भातचे निवेदन बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले.

उत्तर प्रदेश मधील मुजफ्फर नगर येथे एका सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये जावेद हबीब एका महिलेवर हेअर स्टाईल चा डेमो दाखवत असताना शोमध्ये सर्वांसमोर त्या महिलेच्या केसांमध्ये चक्क थुंकतानाचा व्हिडिओ समोर आला होता. हा खूप आपमानास्पद व लाजीरवाणा प्रकार आहे. आपण ग्राहकांना देवासमान मानतो, ही आपली प्रथा आहे. जरी हा सेमिनारचा भाग असला तरी अशा प्रकारची वागणूक करण्याचा अधिकार कोणालाच नाही. त्याने महिलेचा तसेच सलून व्यवसायाचाही अपमान केला आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशनला निवेदन देत सदर घटनेचा निषेध करण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष.पै सुधाकर माने,माजी अध्यक्ष नवनाथ आपुणे, उपाध्यक्ष सुदाम कडणे, खजिनदार गणेश चौधरी, सचिव किरण कर्वे, अँड सौरभ कुंभार, सहसचिव किसान भाग्यवंत, चेअरमन महेश वारुळे, श्रीपाल राऊत,अनिल जाधव, किशोर माने, सागर माने, अमोल राऊत, आदेश आपुणे, (महाराज)अजित यादव, रोहन शिंदे,रणधीर गाडेकर तसेच समाज बांधव उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button