महाराष्ट्र

जैनकवाडी मध्ये हरणाची शिकार कोणी केली ?.

आरोपी ला सजा होणे गरजेचे:पक्षी प्राणी मित्राची अपेशा.

जैनकवाडी मध्ये हरणाची शिकार कोणी केली ?.

आरोपी ला सजा होणे गरजेचे:पक्षी प्राणी मित्राची अपेशा.

बारामती:वार्तापत्र जर अभिनेता सलमान खान,माजी मंत्री बाबा आत्राम यांना चिंकारा प्रकरणात सजा होत असेल किंवा खटला चालविला जात असेल तर जैनकवाडी मधील आरोपीला सुद्धा सजा होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा पक्षी व प्राणी मित्र संघटनेच्या वतीने अपेशा व्यक्त होत आहे.
बारामती तालुक्यातील जैनकवाडी येथील पवारवस्ती परिसरातील वन परिक्षेत्रात भर दिवसा सकाळच्या वेळी चिंकारा हरणाची शिकार करण्यात आली.पार्टी साठी चिंकारा हरणाची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.यावेळी काही जागरुक नागरिकांनी वेळीच लक्ष दिल्याने संबंधित आरोपींचा चिंकारा पार्टीचा बेत चुकला.मात्र चिंकाराला आपला जीव गमवावा लागला.याप्रकणामुळे एकच खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत वनविभागाने माहिती मिळताच कार्यवाही करीत गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्राणीप्रेमींमधुन होत आहे.
सोमवार (ता.08) रोजी जैनकवाडी येथील पवारवस्तीच्या परिसरात शेतकरी आपली कामे करीत असताना त्यांना एक जखमी चिंकारा जातीचे हरणाचा शिकारी कुत्रा पाठलाग करताना दिसले.त्यांनी यावेळी त्याच्या मागे एक व्यक्ति पळत होता. त्या हरणाला ठार मारुन कुत्रा बाजुला झाला.यावेळी संबंधित व्यक्तीला शेतकऱ्याने हटकले असता त्याने दमबाजी केली.यावेळी परिसरातील नागरिक जमा झाल्याने शिकाऱ्याने तेथुन पळ काढला.या घटनेचे मोबाईल चित्रिकरणही करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या नागरिकांच्या म्हणण्यानुसार आणखी चार ते पाच जण शिकारीसाठी जाळे लावुन बसल्याचे पाहिले.विशेष बाब अशी की हा प्रकार भर दिवसा सकाळी अकराच्या दरम्यान घडला.याबाबतची माहिती बारामती वनविभागाला मिळताच दुपारी बाराच्या दरम्यान त्यांनी घटनास्थळाला भेट देवुन पंचनामा करुन संबंधितांवर वन पशुहत्या गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान हा प्रकार बारामतीत घडल्याने उपवनसंरक्षक श्री.लक्ष्मी,सहाय्यक वनसंरक्षक वैभव भालेराव, बारामतीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल टी. जे. जराड, वनरक्षक श्रीमती कवितके, वनमजूर काळंगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बारामतीमधील यापूर्वीचे चिंकारा प्रकरण खुप गाजले होते.यामुळे यावे संबंधितांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी प्राणी प्रेमींमधुन होत आहे. एमआयडीसी परिसर लगत,वंजारवाडी,कटफळ जैनकवाडी चा काही परिसर येत असल्याने एमआयडीसी परिसरातून अनेक जण शिकारी साठी नेहमी येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram