स्थानिक

सुशोभिकरण केलेल्या कालव्यावर दारू पिणाऱ्या लोकांच्यावर कारवाई

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 117 प्रमाणे खटला भरण्यात आला.

सुशोभिकरण केलेल्या कालव्यावर दारू पिणाऱ्या लोकांच्यावर कारवाई

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 117 प्रमाणे खटला भरण्यात आला.

 क्राईम;बारामती वार्तापत्र

सध्या निरा कॅनल चे सुशोभीकरण करून बारामतीच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याचे काम वेगाने सुरू आहे. कॅनल ला तीन हत्ती माळावरची देवी पर्यंत विद्युतीकरण लाईट करण्यात आलेले आहे. परंतु तीन हत्ती चौक ते पाणी शुद्धीकरण केंद्र सातव चौकापर्यंत कॅनॉल ला लायटिंग केलेली नाही अंधाराचा व झाडीचा फायदा घेऊन सायंकाळी सातनंतर अनेक लोक वाईन शॉप ,दारू दुकान मधून पार्सल आणून सदर भागामध्ये दारू पीत बसत असले याबाबतच्या तक्रारी पोलिस स्टेशनला प्राप्त होत्या त्यावेळेस पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस हवालदार प्रकाश मोघे पोलीस हवालदार यशवंत पवार यांनी अचानक पणे त्या ठिकाणी रात्री आठच्या दरम्यान जाऊन कारवाई केली असता खालील इसम

1)विजय महादेव खोमणे वय 21 वर्षे राहणार कोराळे तालुका बारामती जिल्हा पुणे
२,) काशिनाथ प्रल्‍हाद गावडे वय 23 वर्षे राहणार मेडद तालुका बारामती जिल्हा पुणे
३) सुनील शामराव गावडे वय २५ वर्ष राहणार पाटस रोड बारामती
४) आशुतोष प्रदीप परकर वय २९ वर्षे राहणार ख्रिश्चन कॉलनी बारामती
५) प्रणव राजेंद्र उंडे वय २८ वर्षे राहणार सद्गुरुनगर पाटस रोड बारामती
६) शेर सिंग विक्रम सिंग राठोड वय 28 राहणार ख्रिश्चन कॉलनी बारामती त्या ठिकाणी बिसलरी बॉटल व पार्सल आणलेली दारू पीत असलेले निदर्शनास आले.

त्यातील काही इसम पिणारा च्या बाजूला उगाचच बसले होते त्यांना योग्य ती समज दिली व त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 117 प्रमाणे खटला भरण्यात आला. अधून मधून शहरामधील असे निर्जन गाण्याचे हॉटस्पॉट ओळखून या भागात कारवाई करण्यात येणार आहेत स्थानिक लोकांना असे कोणी निदर्शनास आल्यास तात्काळ कळवावे पोलीस विभागातर्फे त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Back to top button