शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला फोन करून तब्येतीची विचारपूस
काही दिवसांमध्ये राज्यातले अनेक मंत्री आणि विविध पक्षांतले अनेक प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई ;प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून पवारांच्या तब्येची चौकशी केली. पंतप्रधान मोदी सध्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकी प्रचारात व्यस्त आहे, याही व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पंतप्रधानांनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. पंतप्रधानांनी फोन करून चौकशी केल्याबद्दल शरद पवारांनी आभार मानले आहे.
कोरोनाच्या दोन लाटेत अनेक राजकीय नेत्यांना लागण झाली होती. मात्र, याला शरद पवार हे अपवाद ठरले होते. कोरोनाच्या काळात शरद पवार यांनी दौरे केले होते. पण, तरीही त्यांना कोरोना स्पर्शही करू शकला नाही. मात्र, आता तिसऱ्या लाटेत शरद पवारांना कोरोनाने गाठले आहे. आज दुपारीच शरद पवार यांनी आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली.