राजकीय

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा,28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला सोठचिठ्ठी दिलीय.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा,28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला सोठचिठ्ठी दिलीय.

प्रतिनिधी

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा बसला आहे. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमात रशीद शेख, ताहिरा शेख यांच्यासह 28 नगरसेवक यांनी पक्षांतर केलं. यावेळी अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

मालेगाव महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सर्व 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. मालेगावमधील काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला सोठचिठ्ठी दिलीय. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

Related Articles

Back to top button