दोन गुंठ्यातच केली पालेभाज्यांची नाविन्यपूर्ण शेती: सौ. सुभांगी जगदाळे यांचे सर्वत्र कौतुक
शुभांगीज फ्रेश व्हेजीज.
दोन गुंठ्यातच केली पालेभाज्यांची नाविन्यपूर्ण शेती: सौ. सुभांगी जगदाळे यांचे सर्वत्र कौतुक
शुभांगीज फ्रेश व्हेजीज..
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द, शारदा नगर माळेगाव कॉलनी येथील सौ सुभांगी यशवंत जगदाळे यांनी अवघ्या दोन गुंठा जागेत वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या तसेच पालेभाज्यांची नाविन्यपूर्ण शेती करून दाखवली आहे.
सध्याच्या काळात सर्वांनाच ‘विषमुक्त भाजीपाला’ खाऊन प्रत्येकाला स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे. व कोरोनाला पळवून लावायचे आहे. त्यामुळे आता बऱ्याच लोकांचा कल सेंद्रिय शेती व भाजीपाला, फळे खाण्याकडे वाढला आहे. परंतू बाजारातून आणलेला प्रत्येक माल हा खरच सेंद्रिय आहे का. ? हा प्रश्न उपस्थित होतोच.
विषमुक्त भाजीपाला, फळे यांची उपलब्धता ही एक सर्वांनाच अडचण आहे. आणि याच अडचणीवर मात करण्यासाठी सौ सुभांगी यशवंत जगदाळे (रा: माळेगाव खुर्द शारदा नगर माळेगाव कॉलनी ता. बारामती) यांनी स्वतःच्या दोन गुंठे जागा मध्ये “शुभांगीज फ्रेश व्हेजीज” या अंतर्गत वर्षभर लागणारा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकांची लागवड या ठिकाणी केली आहे.
त्या स्वतः सांगतात की दररोजच्या जेवणात स्वतः पिकवलेला सेंद्रिय किंवा विषमुक्त भाजीपाला खाणे व त्यांची चव व खाताना जो आनंद होतो तो शब्दात सांगू शकत नाही अजून त्या सांगतात की त्यामुळे दररोजच्या त्यांच्या मोकळा वेळ कसा जातो हे त्यांच्या लक्षात येत नाही व फ्रेश भाजीपाला खावयास मिळतो व त्यांची दोन्ही मुले शंभूराज व साईराज यांनाही आत्तापासून शेती करण्याची गोडी लागली आहे. या किचन गार्डन मध्ये दररोज लागणारा भाजीपाला जसे की टोमॅटो, मिरची, कांदा, लसूण, वांगी, कोथिंबीर, पालक, मेथी, चाकवत, तांदुळजा, अळू, पुदिना, भोपळा, भेंडी, घेवडा, वाटाणा, पावटा, राजमा, काकडी, गाजर, बीट, कोबी, बटाटे, फ्लॉवर, ब्रोकोली, स्वीटकॉर्न, शेवगा, कढीपत्ता, लाल कोबी, मोहरी, भुईमूग, तसेच फुल झाडे गुलाब, मोगरा, शेवंती, कुंद, ग्लॅडीलोअस सारखी व फळांमध्ये आंबा, पपई, नारळ, पेरू, डाळिंब, इत्यादी पिकांची लागवड फक्त दोन गुंठे क्षेत्रात केली आहे म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग असतो तसे.
या कामात त्यांना त्यांचे पती श्री. यशवंत लालासो जगदाळे यांचीही मदत होते. विशेष म्हणजे सोबत असलेल्या फोटोत गाजराच्या पिकाची वाढ ही गणराया गणराया मोरया सारखी झाली आहे. तेही त्यांच्या बागेतच याची तांत्रिक कारण जरी मातीतील कमी ओलावा व कडकपणा असे असले तरी त्यांनी गणरायाचे रूप धारण केले आहे याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.