चुकीच्या पार्किंग साठी दंड :उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांची माहिती.
रस्त्यावरील चुकीच्या पार्किंग साठी आता रीतसर दंड.
चुकीच्या पार्किंग साठी दंड :उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांची माहिती.
रस्त्यावरील चुकीच्या पार्किंग साठी आता रीतसर दंड.
बारामती:वार्तापत्र बारामती शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी व चुकीचे पार्किंग केल्यास वाहतुकीस अडचण निर्माण होते म्हणून चुकीच्या पद्धतीने वाहने पार्किंग केल्यास दंड आकारला जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.
बारामतीतील वाहतूक सुरळीत व्हावी व सर्वसामान्य जनतेला वाहतूकीकरिता अडचण निर्माण होऊ नये म्हणून बारामती वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्याचे काम सुरू झाले आहे.
यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केले गेले असेल तसेच रस्त्यावर अडथळा होईल अशा प्रकारे वाहने लावले असता त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येणार आहे.
असा खटला दाखल झाल्यानंतर सदर गाडीवर खटला दाखल केल्याचे स्टिकर चिटकवन्यात येईल.यासाठी स्टीकरवर दिलेल्या माहितीवरून संबंधित वाहन मालकास कळेल की त्याच्यावर खटला भरलेला आहे.
सदर खटल्यामध्ये झालेला दंड व मोटार वाहन कायद्याचे कलम वेबसाईटचे नाव इत्यादी सर्व माहिती सदर वाहन रजिस्ट्रेशन करताना आरटीओ कार्यालयाकडे जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर जाणार आहे.
तसेच सदर वेबसाईटची माहितीही या स्टिकर वर दिलेली आहे.(सोबत स्टिकर पाठवत असणार आहे)
सदर झालेला दंड जर 30 दिवसाचे आत ऑनलाइन भरला नाही तर सदर वाहन चालकाच्या विरोधात कोर्टामध्ये खटला पाठवला जाणार असल्याची माहिती शिरगावकर यांनी दिली
तरी सर्व नागरिकांनी त्यांचे वाहनावर कारवाई होऊ नये याकरिता आपली वाहने योग्यरीतीने पार्किंग करावीत.