इंदापूर महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून राजवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा
महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी व्हॉलीबॉल क्लबची स्थापना
इंदापूर महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून राजवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा
महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी व्हॉलीबॉल क्लबची स्थापना
इंदापूर : प्रतिनिधी
निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
वाढदिवस हे औचित्य असून सामाजिक बांधिलकी लक्षात घेता पर्यावरणीय जनजागृतीसाठी वृक्ष लागवडीचा संकल्प करून महाविद्यालयामध्ये विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी व्हॉलीबॉल क्लबची स्थापना करून क्लबच्या माध्यमातून संध्याकाळच्या मोकळ्या वेळेमध्ये कर्मचाऱ्यांनी व्हॉलीबॉल खेळाचा आनंद घेऊन ताण-तणाव कमी करण्याच्या हेतूने क्लबची स्थापना करण्यात आली. तसेच महाविद्यालयातील १०३ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्याच्या संदर्भाने उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. तांबे, डॉ. शहाणे, डॉ. मोटेगावकर आणि कोकरे यांनी मार्गदर्शन केले व आरोग्यासंबंधीचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयातील ५३४ विध्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य संजय चाकणे, उपप्राचार्य नागनाथ ढवळे, शारिरीक शिक्षण संचालक डॉ. भरत भुजबळ, विज्ञान विभागप्रमुख डॉ. शिवाजी वीर, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड, कला विभागप्रमुख डॉ. भिमाजी भोर तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.