विंडीज सीरिज धोक्यात! टीम इंडियाचे 8 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
हॉटेलमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली होती.

विंडीज सीरिज धोक्यात! टीम इंडियाचे 8 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
हॉटेलमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली होती.
प्रतिनिधी
भारत-वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरीज सुरु होण्याआधी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाच्या चमूतील बहुतेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियातील आठ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.
शिखर धवन , ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर सह 8 जण पॉझिटिव्ह आढळले आहे. चार दिवसांनी वनडे सीरिज सुरू होणार आहे. त्याआधीच कोरोनाने एंट्री केली आहे.
8 भारतीय खेळाडू पॉझिटिव्ह आले आहे. दोन्ही टीम एकाच हॉटेलमध्ये थांबल्या आहेत. पण, हॉटेलमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली होती. तेव्हा टेस्ट निगेटिव्ह आले होते. पण आज शिखर धवनसह आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं खबरदारीचा उपाय सर्व खेळाडूंची काळजी घेण्यात आली होती. पण अचानक एकाच वेळी ८ खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. 6 फेब्रुवारीपासून वनडे सीरिज सुरू होणार आहे.
दरम्यान, भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मालिकेसाठी टीम इंडियाच्या 18 खेळाडूंची घोषणा टीम इंडियाने यापूर्वीच केली आहे. त्यानंतर दोन तरूण खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. देशातील कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून या खेळाडूंचा निवड समितीनं समावेश केला आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार तामिळनाडूचा आक्रमक बॅटर शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि स्पिनर रविकृष्णन साई किशोर (Ravisrinivasan Sai Kishore) यांचा स्टँड बाय खेळाडू म्हणून टीममध्ये समावेश केला आहे. शाहरूख खाननं गेल्या काही महिन्यात आक्रमक बॅटींगनं भारतीय क्रिकेट गाजवलं आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत त्याने तामिळनाडूला विजेतेपद मिळवून दिले होते. वेस्ट इंडिज विरूद्धच्या मुख्य टीममध्ये दीपक हुडाला (Deepak Hooda) शाहरूखच्या ऐवजी प्राधान्य देण्यात आले आहे.