इंदापूर

बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करा ; इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

इंदापूरच्या पोलिसांना दिले निवेदन

बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करा ; इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

इंदापूरच्या पोलिसांना दिले निवेदन

इंदापूर : प्रतिनिधी

बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल साताऱ्यात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.४) कराडकर यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंदापूर पोलिसात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ह.भ.प बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे आणि इंदापूर तालुक्यातील गोतंडी येथे राष्ट्रवादीच्या नेत्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी बिनबुडाचे आणि आक्षेपहार्य विधान केले आहे.महिलां विषयीचे केलेले हे विधान निंदनीय आहे. त्यांच्या या विधानाने महाराष्ट्रातील सर्व जनता व्यथित आणि दुःखी झाली आहे. त्यांच्या या विधानाने महिलांचे चारित्र्यहनन करण्याचा कुटील डाव केला आहे. त्यामुळे बंडातात्या कराडकर यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील,शत्रुघ्न शिंदे, पोपट शिंदे,बाळासाहेब जगताप,वसंत आरडे,मारुती कन्हेरे,नवनाथ बोंगाणे,अमोल भिसे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button