गेल्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचा निर्णय
जामिनाचा मार्ग मोकळा
गेल्या दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचा निर्णय
जामिनाचा मार्ग मोकळा
सिंधुदुर्ग:प्रतिनिधी
संतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना आजही दिलासा मिळाला नाही. नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता नितेश राणे हे जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार आहेत.
संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवलीमधील दिवाणी व्यायालयात हजर केलं गेलं. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं.
आमदार नितेश राणेंना पुण्याला नेऊन त्यांची चौकशी करायची आहे, त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं. तर नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी यावर युक्तिवाद करत आरोपीला पुण्याला घेऊन जाण्याची आवश्यकता का आहे असा सवाल केला होता. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी देऊ नये असाही युक्तीवाद त्यांनी केला.
दोन दिवसांत आरोपीकडून मोबाईल आणि सिम कार्ड जप्त केले, अजून तपास बाकी असून पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.
दरम्यान आजच्या सुनावणीवेळी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता.