हर्षवर्धन पाटील यांचेकडून वरकुटे बु. येथील जळीत ऊस पिकाची पाहणी
- कर्मयोगी कडून तातडीने ऊसतोड

हर्षवर्धन पाटील यांचेकडून वरकुटे बु. येथील जळीत ऊस पिकाची पाहणी
– कर्मयोगी कडून तातडीने ऊसतोड
इंदापूर : प्रतिनिधी
वरकुटे बु. येथील जळीत ऊस पिकाची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.५) पाहणी केली. वरकुटे बु. – करेवाडी परिसरातील १० शेतकऱ्यांच्या सुमारे ३२ एकर क्षेत्रावरील ऊसाचे पीक शुक्रवारी दुपारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. या जळीत ऊस पिकाची कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याने तातडीने सकाळपासूनच तोड चालू केली आहे.
या पाहणी वेळी हर्षवर्धन पाटील यांनी संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचेशी संपर्क साधून जळीत पिकांचे पंचनामे करण्यासंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी कारखाना व आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले व सर्व उसाचे गाळप केले जाईल असे नमूद केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, केशव दुर्गे, प्रवीण देवकर, यादवराव देवकर, सुभाष काळे, बजरंग करे, गणपत करे, शाहीर करे, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.