स्थानिक

बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी बी. डी. कोकरे; तर उपाध्यक्षपदी ,अजित शेरकर, राजकिरण शिंदे विजय

चार उमेदवार रिंगणात होते.

बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी बी. डी. कोकरे; तर उपाध्यक्षपदी ,अजित शेरकर, राजकिरण शिंदे विजय 

चार उमेदवार रिंगणात होते.

बारामती वार्तापत्र

बारामती वकील संघटनेची आज निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या शर्यतीत एड. बी.डी. कोकरे यांनी 147 मतांनी विजय संपादन केला सन 2022- 23 या आर्थिक वर्षाकरिता ही निवडणूक प्रक्रिया आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

तर उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एड. अजित शेरकर व एड. राजकिरण शिंदे विजयी झाले. सचिवपदी संदीप पाटील, सहसचिवपदी सोहेल शेख, खजिनदारपदी ऋषिकेश निलाखे, ग्रंथपालपदी प्रीतम क्षीरसागर तर महिला प्रतिनिधी या जागेसाठी उषा गावडे पोंदकुले या विजयी झाल्या.

सचिवपदी संदीप सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहसचिव पदासाठी सोहेल शेख व मंगेश लोंढे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये 404 मते मिळवून सोहेल शेख विजयी ठरले. खजिनदारपदी ऋषिकेश निलाखे, ग्रंथपाल पदी एड.प्रीतम क्षीरसागर तर महिला प्रतिनिधी म्हणून एड. उषा गावडे यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडणुकीसाठी एड. राजेंद्र काळे, विजय तावरे, डी.टी. शिपकुले, संजय टकले, नितीन अवचट, प्रवीण कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. विजयी उमेदवारांचे वकील संघटनेचे मावळते अध्यक्ष चंद्रकांत सोकटे, सचिव अजित बनसोडे, उपाध्यक्ष स्नेहा भापकर, ग्रंथपाल स्वरूप सोनवणे यांनी अभिनंदन केले व सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!