शैक्षणिक

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दुसरी टर्म ऑफलाईन घेण्यात येणार

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 दुसरी टर्म ऑफलाईन घेण्यात येणार

प्रतिनिधी

सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात येणार आहे.  CBSE ची दहावी बारावीची पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर 2021 घेण्यात आली. आता सीबीएसईच्या दुसऱ्या टर्मची तारीख जाहीर करण्यात आली आहे.दहावी आणि बारावीची परीक्षा 26 एप्रिल पासून घेण्यात येणार आहे.   विशेष म्हणजे दुसरी टर्म ऑफलाईन घेण्यात येणार आहे.

कोरोना संकटामुळे मागच्या वेळेप्रमाणे बोर्ड परीक्षा रद्द होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता दुसऱ्या टर्मची डेटाशीट लवकरच जारी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसना परीक्षेच्या तयारीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे. दरम्यान 5 जुलै 2021 ला कोरोनामुळे बोर्डाने परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याची घोषणा केली होती.

दुसऱ्या टर्ममध्ये विद्यार्थ्यांना ऑबजेक्टिव्ह आणि सबजेक्टिव्ह असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे. पहिल्या टर्ममधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेसाठी सँपल पेपर पॅटर्न फॉलो करण्यात येणार आहे. सँपल पेपर गेल्या महिन्यात सीबीएसईची अॅकडेमिक वेबसाईटवर जारी करण्यात येणार आहे. डेटाशीट लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट  cbse.nic.in जारी करण्यात येणार आहे.

केंद्रीय शिक्षा बोर्डाने पहिल्यांदा  10 वी आणि 12 वीच्या अंतिम परीक्षा दोन टर्ममध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्याच आला.

Related Articles

Back to top button