ग्राहकांना गुणवत्तापूर्ण घरे योग्य दरात मिळणार का ? – डॉ. अमित होले
केंद्रशासनाने जीसटी बाबत सुधारित धोरण अवलंबण्यास हवे.
ग्राहकांना गुणवत्तापूर्ण घरे योग्य दरात मिळणार का ? – डॉ. अमित होले
केंद्रशासनाने जीसटी बाबत सुधारित धोरण अवलंबण्यास हवे.
बारामती वार्तापत्र
आपल्या देशामध्ये सर्वाधिक जास्त रोजगार निर्मिती करून देणाऱ्या क्षेत्रामध्ये शेती व शेती पूरक व्यवसाय बरोबर
बांधकाम व्यवसायाचे नाव अग्रक्रमाने घेण्यात येते. काही महिन्यापासून बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्या
मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत .
यामध्ये प्रामुख्याने लागणारे स्टील ( सळई), सिमेंट, विटा, वाळू तसेचमजुरीचे दर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . साधारणतः बांधकामाचा प्रति स्के फूट दर हा 20 ते 25 %टक्क्यांनी वाढला आहे.
सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांची पूर्तता करणाऱ्या बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठीकच्या मालाच्या किमती नियंत्रित ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनदारी सकारात्मक प्रयन्त होऊन सरकारला सर्वाधिक महसूल देणाऱ्या रियल इस्टेट क्षेत्राला बळ देण्याची गरज आहे.
लॉकडाउनमध्ये बरेचसे मजुरांचे स्थलांतर झाले आहे त्यामुळे निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान विकसकांसमोर आहे. रेराने विकसकासमोरील अडचणी लक्षात घेऊन प्रकल्पास मुदत वाढ देणे गरजेचे आहे. केंद्रशासनाने जीसटी बाबत
सुधारित धोरण अवलंबण्यास हवे.
पायाभूत सुविधा तसेच घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या क्षेत्राकडे वित्तीय संस्था तसेच बँकांनी सकारात्मक राहून योग्य व्याजदराने कर्ज पुरवठा करणे गरजेचे आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अनुदानात वाढ करून योजनेची व्याप्ती वाढवली गेली पाहिजे.
ग्राहकांना योग्य आणि अपेक्षित किंमतीत गुणवत्तापूर्ण घर मिळण्यासाठी बांधकामासाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या किमती नियंत्रणात ठेवून शासनाची रियल इस्टेट क्षेत्राबाबतची ध्येय धोरणे पूरक असणे आवश्यक आहेत.
डॉ. अमित होले. SVPM’S इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेन्ट, माळेगाव, बारामती ह्या संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.