मुंबई

‘दीदींच्या स्मारकाचे राजकारण थांबवा,पंडित हृदयनाथ मंगेशकर

मंगेशकर कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘दीदींच्या स्मारकाचे राजकारण थांबवा,पंडित हृदयनाथ मंगेशकर

मंगेशकर कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबई :प्रतिनिधी

भारतरत्न गानसम्राज्ञी लता यांच्या चर्चित शिवाजी पार्कमधील स्मारकाच्या मुद्द्यावर राजकीय वाद सुरू झाला आहे. काही नेत्यांनी लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे, अशी मागणी केली आहे. तर काही नेत्यांनी या स्मारकाला विरोध दर्शविला आहे. यावर लतादीदींचे बंधू आणि सुप्रसिद्ध संगीतकार पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी आपले मत व्यक्त करत सर्व नेत्यांना स्मारकावरून होणारे राजकारण थांबवण्याची विनंती केली आहे. शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक व्हावे, अशी आमची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली.

…हीच खरी श्रद्धांजली

पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, दीदींच्या स्मारकावरून जो वाद सुरू आहे. तो राजकारण्यांनी थांबावावा. दीदींच्या बाबतीत कोणतेही राजकारण करू नये. आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठाची स्थापना हीच लतादीदींना खरी श्रद्धांजली आहे. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन लता दीदींना दिले होते. यासंदर्भात स्वत: लतादीदींनी सरकारकडे विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ही विनंती मान्य करून त्यासंदर्भात पूर्वतयारी केलेली आहे. दीदींचे संगीत स्मारक तयार होत आहेत, यापेक्षा अन्य कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही.

काय म्हणाले हृदयनाथ मंगेशकर
शिवाजी पार्क हे क्रीडा उद्यान आहे, या उद्यानात लतादीदींचं स्मारक होऊ नये, महाराष्ट्र सरकार लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या रुपाने जे करतंय, तेच खरं स्मारक आहे, लतादीदी या साक्षात श्रद्धामूर्ती असल्याने संगीताची श्रद्धा वाहणं महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Back to top button