नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते महिला व दिव्यांग बचत गटांना कर्ज मंजुरीचे पत्र वाटप
दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत कर्ज मंजूर

नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते महिला व दिव्यांग बचत गटांना कर्ज मंजुरीचे पत्र वाटप
दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत कर्ज मंजूर
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील महिला व दिव्यांग बचत गटांना नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते सोमवारी (दि.१४) स्टेट बँक ऑफ इंडिया इंदापूर यांच्या वतीने मंजूर झालेल्या अकरा लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इंदापूर शाखेचे अधिकारी नंदकिशोर,कर्ज वितरण विभागाचे दुर्गाडे, चोरमले,बाळासाहेब बोंगाणे व बंडगर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुभाष ओहोळ,समुदाय संघटक योगिता सरगर,अल्ताफ पठाण यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.नगरपरिषदेचे सभा अधीक्षक गजानन पुंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.योगिता सरगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कुरेशी महिला बचत गट( एक लाख रुपये), व्यंकटेश्वर दिव्यांग बचत गट(एक लाख रुपये),संत सखुबाई महिला बचत गट (दोन लाख रुपये), विघ्नहर्ता महिला बचत गट(चार लाख रुपये),संघर्ष महिला बचत गट (एक लाख रुपये),शिवगौरी महिला बचत गट(दोन लाख रुपये) अशी कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आलेल्या बचतगटांची नावे आहेत.