शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवन जगा – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जीवन जगा – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
इंदापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने जीवन जगावे, त्यामुळे यशस्वीपणे जीवन जगता येईल, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.इंदापूर आय कॉलेज समोर शनिवारी (दि.१९) सकल युवा शिवभक्त इंदापूर तालुक्याच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका समाजाचे नव्हते. संपूर्ण विश्वावर राज्य करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती.जगाच्या कोणत्याही भागात गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. जीवन जगत असताना छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचे विचार दिले, संघर्षावर मात करण्याची शिकवण दिली.असे ते म्हणाले.यावेळी मान्यवर व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.