चारा घोटाळा प्रकरणी; बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

सीबीआय स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश एसके शशी यांनी हा निकाल दिला.

चारा घोटाळा प्रकरणी; बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

सीबीआय स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश एसके शशी यांनी हा निकाल दिला

प्रतिनिधी

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव  यांना चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांना 60 लाखांचाही दंड ठोठावण्यात आला आहे.

आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. 15 फेब्रुवारी रोजी न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. या पाचव्या प्रकरणापूर्वी लालू यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा झाली आहे.

दरम्यान, लालूप्रसाद यांच्या वकिलांनी लालूंना जामीन मिळावा म्हणून अर्ज करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु, लालूंना जामीन न मिळाल्यास त्यांना तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सीबीआयच्या विशेष कोर्टाने 15 फेब्रुवारी रोजी लालूप्रसाद यादव यांच्यासह इतर आरोपींना डोरंडा कोषागार संबंधित चार घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. हा 139.5 कोटींचा घोटाळा होता. त्यावेळी कोर्टाने शिक्षा सुनावली नव्हती. आज या प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली असून लालूंसाठी हा निकाल मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

सीबीआयने रविवारी सांगितलं की, विशेष न्यायालयाने शनिवारी याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार आज 41 आरोपींपैकी न्यायालयात हजर 38 दोषींना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शिक्षा सुनावण्यात आली. मात्र यापैकी तीन दोषी 15 फेब्रुवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहू शकले नव्हते, ज्यामुळे न्यायालयाने तिघांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे.

सीबीआयच्या प्रमुखांनी सांगितलं की, 38 दोषींना शिक्षा सुनावण्यात आली, ज्यापैकी 35 बिरसा मुंडा तुरुंगात आहे. तर लालू प्रसाद यादव सह अन्य दोषी आरोग्याच्या कारणास्तव रिम्समध्ये दाखल आहेत. न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना भारतीय दंड संहिताच्या कलम 409, 420, 467, 468, 471 सह षड्यंत्रासंबंधित कलम 120ब आणि भ्रष्टाचार निवारण अधिनियम कलम 13(2)के अंतर्गत दोषी घोषित करण्यात आलं आहे.

या प्रकरणात सीबीआयने एकूण 170 आरोपींविरोधात आरोप पत्र दाखल केला होता. तर 148 आरोपींविरोधात 26 सप्टेंबर 2005 मध्ये आरोप लावण्यात आले होते. चारा घोटाळाच्या चार विविध प्रकरणात 14 वर्षांपर्यंत शिक्षा असलेले लालू प्रसाद यादवसह 99 लोकांविरोधात न्यायालयाने सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर 29 जानेवारी रोजी आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.

Related Articles

Back to top button