महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्राची राज्य महिला आयोगाने घेतली दखल;दिशा सालियनबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राणे अडचणीत येण्याची शक्यता!
सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं दिले आहेत
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्राची राज्य महिला आयोगाने घेतली दखल;दिशा सालियनबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राणे अडचणीत येण्याची शक्यता!
सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं दिले आहेत.
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. या पत्राची दखल घेण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांना योगात ते आदेश देण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलीय.
48 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबईतल्या मालवणी पोलिसांना देण्यात आले आहेत. दिशा सालियनची हत्या झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला होता. पोलिसांच्या अहवालानंतरही आणि पोस्टमार्टेम रिपोर्टनंतरही राणेंनी आरोप करुन दिशा सालियनची बदनामी केल्याची तक्रार किशोरी पेडणेकर यांनी केली होती.अखेर राज्य महिला आयोगानं या प्रकरणात लक्ष घातलंय.
दिशा सालियान हिच्या शवविच्छेदन अहवालास तिच्या आईवडिलांनी दुजोरा दिला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे.मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यांच्या या पत्राची दाखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
काय म्हणाले होते नारायण राणे?
अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. दिशा सालियनचा 8 जूनला बलात्कार करुन हत्या करण्यात आली. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी म्हटलं होतं की, सांगितले आत्महत्या केली. मात्र, तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला. सुशांतच्या घरातील सावंत नावाचा मुलगा कुठे गेला? तो अद्याप बेपत्ता आहे. तसेच रॉय म्हणायचा मुलगा होता, तो कुठे गेला, तोही अद्याप गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. तसेच दिशा सालियनच्या घरातील वॉचमन कुठे आहे? तो देखील गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. कोण काहीतरी लपवते, हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले. लपवलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असेही राणे यावेळी म्हणाले.