मुंबई

मलिक हे भाजपविरोधात बोलत त्यामुळे ही कारवाई,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा हल्लाबोल

मंत्री नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे.

मलिक हे भाजपविरोधात बोलत त्यामुळे ही कारवाई,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा हल्लाबोल

मंत्री नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे.

मुंबई :प्रतिनिधी

मलिक हे भाजपविरोधात जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात सप्ष्टपणे भूमिका मांडतात, त्यामुळेचं अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करुन कारवाई होत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं असेही पवार यांनी सांगितले. सत्तेचा गैरवापर करुन लोकांना त्रास देणे, बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना देखील माझ्यावरही असेच आरोप केले जात होते असेही पवार यावेळी म्हणाले.

मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांची ईडी चौकशी सुरु आहे. आज सकाळी साडे सहा वाजता नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्यानंतर मलिकांना ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहण्यास सांगितले. मलिक सकाळी साडे सात वाजता ईडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी पोहोचले. मनी लाँड्रिंग प्रकरणी मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकरने ईडीची चौकशी केल्यानंतर मलिकांना समन्स बजावल्याचं बोललं जात आहे. मलिकांचं आणि अंडरवर्ल्डचं कनेक्शन आहे का? याबाबत चौकशी असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

प्रकरण काय?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram