खळबळ ;सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल!
‘यामध्ये माझा काहीच दोष नाही. हे सर्व गलिच्छ राजकारण आहे’, असे शहाजीराव काकडे यांनी सांगितले आहे.
खळबळ ;सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल!
‘यामध्ये माझा काहीच दोष नाही. हे सर्व गलिच्छ राजकारण आहे’, असे शहाजीराव काकडे यांनी सांगितले आहे.
क्राईम;बारामती वार्तापत्र
बहिणीच्या नावे असलेल्या साडे आठ एकर जमिनीचे बनावट असाईन्मेंट डीड करत जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी, तसेच भाचींचे नावे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात असलेल्या शेअर्सची परस्पर विक्री करत त्याची रक्कम स्वतःसाठी वापरल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात शहाजी मुगुटराव काकडे यांच्याविरोधात फसवणूकीच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . ‘यामध्ये माझा काहीच दोष नाही. हे सर्व गलिच्छ राजकारण आहे’, असे शहाजीराव काकडे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी त्यांचे भाचे अभिजित बापूसाहेब देशमुख (रा. कळंबवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर, सध्या रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी संगीता बापूसाहेब देशमुख (ऐश्वर्या उर्फ संगीता महेंद्रसिंह जाधवराव), मनिषा बापूसाहेब देशमुख (मनिषा राजेंद्र शिंदे) व अनिता बापूसाहेब देशमुख (अनिता प्रमोद बर्गे) या फिर्यादीच्या बहिणी आहेत. या तिघींच्या नावे सोमेश्वर कारखान्याचे शेअर्स होते. त्यापैकी मनिषा व अनिता यांच्या नावे असलेल्या शेअर्सपैकी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे एका शेअर्सची रक्कम त्यांचे बॅंकेत खाते असताना ते नसल्याचे भासवून, बनावट अर्ज करुन रोख स्वरुपात शहाजीराव मुगुटराव काकडे यांनी सोमेश्वर साखर कारखान्यातुन त्याचे कारखान्यावरील प्रशासनातील अधिका-यांशी असलेल्या हितसंबधाचा वापर करुन रोख स्वरुपात शेअर्सचे पैसे दिनांक 16/11/2011 रोजी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथुन काढुन घेतले.
फिर्यादीचे आजोबा कै. मुगुटराव साहेबराव काकडे यांनी साडे आठ एकर जमिनी खरेदी करत ती १९६५ साली फिर्यादीच्या आईच्या नावे स्वखुशीने केली होती. त्या जमिनीचा जुना गट क्रमांक १७१ तर नवीन गट क्रमांक १६७ आहे. त्या जमिनीबाबत बारामती दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट असाईन्मेंट डीड करून दस्त क्रमांक ९३० अन्वये फिर्यादीच्या आईच्या परस्पर ही जमिन परस्पर इतरांना विकून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांची आर्थीक फसवणुक केली आहे अशी फिर्याद देशमुख यांनी दिली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फौजदार शेलार पुढील तपास करत आहेत.