बारामतीत आज महाविकास आघाडीचे भिगवण चौक,बारामती याठिकाणी निषेध आंदोलन
केंद्र सरकार व ईडीचा निषेध व्यक्त करण्यासाठी कार्येकर्ते एकवटणार

बारामतीत आज महाविकास आघाडीचे भिगवण चौक,बारामती याठिकाणी निषेध आंदोलन
केंद्र सरकार व ईडीचा निषेध व्यक्त करण्यासाठी कार्येकर्ते एकवटणार
बारामती वार्तापत्र
केंद्र सरकार व सक्तवसुली संचालनालयाचा ( ईडी ) निषेध व्यक्त करण्यासाठी आज बारामतीत भिगवण चौक याठिकाणी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत बारामती तालुका सोशल मिडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रक प्रसिद्ध करण्यात केले असून कार्येकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी पत्रकात म्हंटले आहे की, केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठविणारे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचेशी सूडबुद्धीने केंद्र सरकारच्या ईडी ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बारामतीत महाविकास आघाडीच्या वतीने बारामतीत जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शुक्रवार दि.२५ फेब्रु.२०२२ रोजी,सकाळी ११:०० वा. भिगवण चौक,बारामती याठिकाणी हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.तरी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर व इम्तियाज शिकीलकर यांनी केले आहे.